कुऱ्हाड तांडा येथील तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी जाधव कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी असलेला मनोज चत्रु जाधव वय १९ वर्ष या तरुणाने दिनांक २६ जून रोजी भवानीच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर या घटनेची खबर कुऱ्हाड येथील पोलिस पाटील व मयताचे मामा यांनी पोलिसांना कळवल्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा दूरक्षेत्रच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी भवानी जंगलात घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा करत आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
परंतु हा आकस्मात मृत्यू नसून मयत मनोज हा कुऱ्हाड गावपरिरात एका जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी गेला व जुगारात पैसे हारल्यावर जुगार अड्डा मालकाने त्याचा मोबाईल मोबाईल हिसकावून घेत माझे पैसे दिले नाही तर तुला महागात पडेल अशी धमकी दिली होती व या धमकीला घाबरुन आमच्या मुलाने आत्महत्या केली असा आरोप मयत मनोजचे आई-वडील व मामा यांनी केला आहे. व तशी तक्रार पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला दिली आहे.
या तक्रारीची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित जुगाराचे अड्डा मालकाला बोलावून त्याच्याकडून मयत मनोज याचा मोबाईल जप्त करुन पुढील तपास सुरु केला होता. परंतु हा तपास सुरु असतांना स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे काही कथित पुढारी व राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे तपासात व्यत्यय येत होता अशी चर्चा ऐकायला येत होती मात्र घटनेचा कसून तपास सुरु असतांनाच सौ.निताजी कायटे यांची अचानक बदली झाल्यामुळे पुढील तपासात व्यत्यय आला असे खात्रीलायक समजते.
परंतु आजही मयत मनोजचे आई,वडील व मामा मनोजच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या जुगाराचे अड्डा मालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मागील दोन महिन्यापासून सतत करत आहेत. परंतु अद्यापही पिंपळगाव हरेश्वरचे पोलिस या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पिंपळगाव पोलिसांबद्दल जनमानसातून केला जात असून कुऱ्हाड गावपरिरातून उलट सुलट चर्चा सुरु आहे.
म्हणून आता पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी याप्रकरणी लक्ष देऊन मयत मनोजच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा व मगरुर दिवसाढवळ्या जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या गावगुंडाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
(मयत मनोज जाधव याचा मोबाईल जुगाराच्या अड्डा मालकाकडून जप्त करण्यात आला असल्याने संबंधीत जुगाराचा अड्डा मालकच या घटनेस जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.)