पिंपळगाव हरेश्वर येथील कु.श्रुतिका प्रवीण तेली ही न.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२१
राष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या
न.एम.एम.एस.२०२०~२१ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये पिंपळगाव हरेश्वर येथील श्रुतिका प्रवीण तेली ही जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर गुणवत्ता यादीत आली तसेच यापूर्वी सुद्धा केंद्रीय नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या निवड पूर्व परीक्षेत सुद्धा मार्च महिन्यात ती जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत आलेली होती.
तिची निवड जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव येथे इयत्ता नववी साठी झाली आहे.तिने या सर्व परीक्षांचा अभ्यास मागील वर्षी घरी बसूनच केला आणि यश संपादित केले.यासाठी तिला तिचे आई-वडील आजी-आजोबा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तिने संपादन केलेल्या यशामुळे संपुर्ण स्तरातून तिची प्रशंसा होत आहे.
श्रुतिका हि समृद्धी फॉऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच LIC चे जेष्ठ विमा प्रतिनिधी श्री प्रविण आर. तेली पिंपळगाव यांची मोठी कन्या आहे. तेली समाज पिंपळगाव व गावातील ग्रामस्थ यांच्या कडून श्रुतिका चे खूप खूप कौतुक होत आहे व सर्वांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.