शिंदाड येथे आजी माजी सैनिकांच्या मातांचा गौरव
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~ ११/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील शिंदाड महिला दिनानिमित्त कॅड. अभय दादा पाटील यांच्या निर्भय लोकसंवाद फौंडेशन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ च्यातर्फे तालुका दक्षता समितीच्या सदस्य पुष्पांजली तांबे, अफसाना सय्यद व ज्योत्स्ना परदेशी यांनी आजी माजी सैनिक – यांच्या मातांचे सत्कार करण्यात आले. शिंदाड येथे राम मंदिरात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजनी पाटील होत्या.
कार्यक्रमास मंगलबाई पाटील, लिलाबाई पाटील या माजी सरपंच व समाधान पाटील चेअरमन विका सोसायटी शिंदाड हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. शिंदाड येथील ४० मातांची मुले देशसेवेसाठी सीमेवर लढायला पाठवली ते आज आपल्या जीवाची परवा न करता भारत देशासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. निर्भय लोकसंवाद फाउंडेशन या संस्थेतर्फे आभार मानले.
अश्या सैनिकांच्या आईचा शाल श्रीफळ व फूल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील महिला बचत गटाच्या सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होत्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन अफसाना सय्यद यांनी केले तर प्रास्ताविक पुष्पांजली तांबे यांनी केले. याप्रसंगी रजनी पाटील, लीला पाटील, पुष्पांजली तांबे, जोत्सना परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सैनिक मातांनी देखील महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा गौरव ही त्यांच्यासाठी अमूल्य व अनमोल भेट असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा निर्भय लोकसंवाद फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी जोत्स्ना परदेशी यांनी आभार मानले.