दारुड्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून विद्यार्थी पाहोचले पोलिस स्टेशनवर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२२
पाचोरा येथील जिल्हा परीषद कन्या शाळेत शिक्षण घेणारी विद्यार्थीनी उमैमा शेख रईस आपले पालककासह न्याय मागण्यांसाठी व दारुड्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून थेट पाचोरा पोलिस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांचे समोर आपली कैफियत मांडली आहे.
याबाबत सविस्त वृत्त असे की पाचोरा येथील जिल्हापरिषद उर्दु कन्या शाळेच्या आवारात दररोज रात्री गावातील दारुडे जमतात व तेथे दारू, व्हिस्की, रम पिऊन तेथेच शाळेच्या आवारात धिंगाणा घालून बाटल्या फोडून जातात. या फुटलेल्या बाटलीच्या काचामुळे दिनांक २३ मार्च बुधवार रोजी याच शाळेत शिकणारी एक विद्यार्थिनी वर्गात प्रवेश करतांना तिच्या पायात फुटलेल्या दारूच्या बाटलीच्या काचामुळे पाय कापला जाऊन पायाला मोठी जखम झाली. या खोलवर झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागल्याने पाय रक्तबंबाळ झाल्याने जखमी विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग घाबरले.
शिक्षकांनी त्या जखमी विद्यार्थ्यांनीस उपचारासाठी लगेचच दवाखान्यात दाखल केले. या जखमेतून जास्त रक्तस्राव झाल्यामुळे संबंधित विद्यार्थीनीला थकवा जाणवत होता. परंतु शिक्षकांनी कार्यत्परता दाखवल्यामुळे वेळीच उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे विद्यार्थी व शिक्षक यांनी सांगितले. विशेष म्हणजे दिनांक २५ मार्च २०२२ शुकवार रोजी रात्री दहा वाजता या टोळीला शाळेचे शिक्षक शेख मोहम्मद जावेद अब्दुल रहीम यांनी शाळेतील वर्गांसमोर दारूच्या बाटलीसह दारु पिऊन धिंगाणा घालतांना रंगेहाथ पकडून त्यांना समज देत असतांनाच या ठिकाणी दारू पिणारा दादाभाऊ चौधरी राहाणार (बाहेरपुरा) हे समज देणाऱ्या शिक्षकांच्या अंगावर धाऊन येत तू पोलिसांना काय बोलावतो तु कोणालाही बोलावून आण मी कुणालाही घाबरत नाही असे सांगत शिक्षकांना धमकावत होता.
म्हणून शिक्षकांनी मुलांच्या भवितव्यासाठी दारुड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उर्दू शाळेचे शिक्षक मंडळ, जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा नंबर १ जागृती विद्यालय पाचोरा व शाळेच्या आवाराच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी थेट पाचोरा पोलिस स्टेशन गाठून मा. पोलीस निरीक्षक यांच्याकडे दारुड्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. कारण या आवारात जिल्हापरिषद मराठी शाळा नंबर 1, जागृती मराठी विद्यालय पाचोरा, उर्दू मुलांची शाळा, उर्दू कन्या शाळा अश्या शाळा असल्याने विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात असून येथे अल्पसंख्यांक समाजाचे विद्यार्थी, गोंड वस्तीत राहणारे गोरगरीब विद्यार्थी, दलीत व मागासलेले विदयार्थी संख्या जास्त आहे.
पाचोरा पोलिस स्टेशनला पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना शाळेचे मुख्याध्यापक एजाज रऊफ बागवान, शेख जावेद रहीम, अजहर खान मोतीवाला, लतिफ मेंमबर, इस्राईल खान, रिजवान खान, सईद शेख, हारून बागवान, सलीम शाह इत्यादी उपस्थित होते.
या शाळेच्या आवारात व परिसरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी या शाळेतील विद्यार्थी, पालकवर्ग व या परिसरातील त्रस्त महिलावर्ग व नागरीकांनी केली आहे.