दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/३०२३

जळगाव पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड, निपक्ष, सडेतोड लिखाण करुन भल्याभल्यांना घाम फोडणारा सज्जनांचा मित्र तर दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे लेखणीचे शिलेदार, दैनिक सकाळ जळगाव आवृत्तीचे माजी सहसंपादक स्पष्टवक्ता शिवाजीराव आबाजी जाधव वय वर्षे (५२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

शिवाजी जाधव यांच्यावर काही दिवसांपासून देवकर हॉस्पिटलमध्ये लिव्हरच्या आजारावर उपचार सुरु होते. ते मृत्युशी झुंद देत असतांनाच उपचारादरम्यान दिनांक २३ मार्च २०२३ गुरुवार रोजी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांची अंत्यविधी आज दुपारी १२ वाजता अमळनेर तालुक्यातील नगाव येथे त्यांच्या मुळ गावी करण्यात येणार आहे.