लोहारी शिवारात गुरे चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, शेतकऱ्यांची चाहुल लागताच चोरटे पसार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२३
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर लोहारी गावाजवळील बहुळा व इंद्रायणी या नद्यांच्या मध्ये असलेल्या सपना हॉटेल (ढाबा) जवळ लोहारी येथील शेतकरी महेश दत्तात्रेय बडगुजर यांची शेतजमीन आहे. याच ठिकाणी खळ्यावर त्यांनी गुरेढोरे बांधण्यासाठी व्यवस्था केली आहे. याच शेतातील खळ्यावर त्यांची बैलजोडी व इतर पाळीव जनावरे बांधली जातात. नियमितपणे आजही महेश बडगुजर यांनी आपली बैलजोडी व इतर जनावरे बांधुन घराकडे निघाले होते.
अशातच आजच सायंकाळी महेश बडगुजर यांच्यावर पाळत ठेऊन बडगुजर हे घराकडे निघाल्याचा फायदा घेत सायंकाळी पाऊणे आठ ते आठ वाजेच्या सुमारास बैलजोडी चोरुन नेण्यासाठी प्रयत्न केला परंतु जवळच असलेले नरेंद्र कडुबा बडगुजर, निलेश बडगुजर, छोटु भिल, महेश बडगुजर यांना महेश बडगुजर हे घराकडे गेले असतांना त्यांच्या गळ्यात कोणीतरी अनोळखी इसम असल्याचे लक्षात आले असत त्यांनी लांबुनच तुम्ही कोण आहेत, यावेळेस तुम्ही काय करत आहात अशी विचारणा करत खळ्याकडे धाव घेतली तेव्हा त्या अनोळखी इसमांनी बैलजोडी सोडून नेत असल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरु केली तेव्हा चोरट्यांनी बैलजोडी सोडून बहुळा व इंद्रायणी दोघ नदीपात्राच्या मधुन पळ काढला आहे.
ही हकीकत पाहून पाचोरा कडून लोहारी गावाकडे येणारे डॉ. जीवन पाटील, नरेंद्र पाटील, निलेश बडगुजर, छोटु भिल यांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. तरी पाचोरा तालुक्यातील आर्वे, लोहारी, लासुरे, वरखेडी, सावखेडा, बिल्धी व इतर आसपासच्या खेड्यापाड्यातील गुराढोरांच्या मालकांनी ही घटना लक्षात घेऊन आपल्या गुराढोरांची चोरी होणार नाही याकरिता काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. जीवन पाटील यांनी केले आहे.