पाचोरा तालुक्यातील लोहारी, वरखेडी व नगरदेवळा भागातून सुदृढ गायी, म्हशींची कत्तलखान्यात रवानगी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२३

आजच्या परिस्थितीत सगळीकडे यांत्रिक पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण वाढले असल्याने गावागावातील तसेच कापूस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्यामुळे आपसूकच ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मुग, चवळी ही पिके कमी झाली असल्याने पाळीव प्राण्यांना चारा उपलब्ध होत नाही. तसेच ढेपचे भाव गगनाला भिडले आहेत. गायरान जमीनीवर काही धनदांडग्यानी ताबा मिळवला आहे. राखीव जंगलात अतिक्रमण वाढले आहे. तर दुसरीकडे दुधाला योग्य भाव मिळत असल्याने दुग्धव्यवसाय करणारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. तसेच गुरे राखण्यासाठी गुराखी मिळत नसल्याने गुरेढोरे पाळणारांची संख्या मोजकीच आहे.

याच संधीचा फायदा घेत वरखेडी, लोहारी व नगरदेवळा येथील काही परवानाधारक (लायसन्स) असलेल्या गुराढोरांच्या व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत कमी वेळात व कमी श्रमात जास्त पैसा कमावण्याच्या नादात शेती उपयोगी बैल, गोऱ्हे, लहान, लहान सुदृढ वासरे, मेला व दुभत्या गायी, म्हशी कमी दराने खरेदी करुन त्यांची कत्तलखान्याकडे रवानगी करत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजला प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे दिवसाढवळ्या गुरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या तसेच बाजारात आलेल्या गायी, म्हशींची परस्पर खरेदी करुन ही जनावरे आपापल्या तबेल्यावर घेऊन जातात परंतु हीच सदृढ जनावरे रात्रीच्या वेळी पाय बांधून मोठमोठ्या ट्रक, ट्रॉला, टेम्पो मध्ये पोत्यांसारखी निर्दयपणे भरुन ही अवैध वाहतूक पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणून ताडपत्री लावून व पुढील व मागील बाजूला भुसाचे भरलेले पोते रचून ही वाहने चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे पाठवली जात आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता काही पांढरपेशी गुराढोरांच्या व्यापाऱ्यांनी सुरु केलेला व्यवसाय असाच सुरु राहिला तर आज आपण आपल्या मुला, बाळांना पुस्तिकेत असलेल्या वाघ, सिंहाचा फोटो दाखवून त्यांची ओळख करुन देतो तशीच भविष्य गाय, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांची करुन द्यावी लागेल हे मात्र निश्चित. म्हणून कायद्याच्या रक्षकांनी या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष देऊन संबंधित व्यापारी व पशुधनाचे मालकांवर गुन्हा दाखल करावा व कत्तलखान्यात जाणारी गुरेढोरे वाचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या