२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कुऱ्हाड येथे मोफत नाडी परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त
जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल, स्वर्गीय रमेशबापू फाऊंडेशन संचलित उर्दू माध्यमिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक पद्धतीने मोफत नाडी परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरवातीला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. मा. श्री. योगेश तेली यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून लगेचच नूतन सरपंच सौ. कविता महाजन यांच्या शुभहस्ते धन्वंतरी मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शिबिरात कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड तांडा, सांगवी, सार्वे, जामने, साजगाव या गावातील गरजु ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रविण तेली यांनी केले आहे.
विशेष म्हणजे या मोफत नाडी तपासणी व आरोग्य तपासणी शिबीरात वैद्य एवम आयुर्वेदाचार्य अग्नीकर्म व विध्दकर्म तज्ञ योगेश तुकाराम तेली.(मंगरुळे) (बि.ए.एम.एस.) यांच्या उपस्थितीत मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा , वजन कमी करणे, वजन वाढवणे, मायग्रेन, मणक्याचे दुखणे, गुडघेदुखी यावर योग्य मार्गदर्शन, औषधोपचार व सल्ला देणार असल्याने जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल कुऱ्येहाड येथे येऊन जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगदिश तेली, संतोष चौधरी, कौतिक पाटील, कैलास पाटील, अशोक देशमुख, रमेश मुके, अरुण बोरसे, अशोक बोरसे, सुधाकर महाजन, इरफान कांकर, बानोबी कांकर, जमिल कांकर, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. प्रदीप पवार, डॉ. इसुफ शेख, मेडिकल असोसिएशन कुऱ्हाड व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित रहाणार आहेत.