भाग्यलक्ष्मीनगर भागातील बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी लांबवला ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२२
पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील भाग्यलक्ष्मीनगर भागातील बंद घरात अनाधिकृतपणे प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी गोदरेज कपाटातील सोने – चांदीच्या ३२ हजार रुपयांच्या दागिन्यांसह ६ हजार रुपये रोख असा एकूण ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील पुनगाव रोडवरील भाग्यलक्ष्मीनगर भागात भिकन विठ्ठल पाटील हे वास्तव्यास आहेत. दिनांक ०७ जुलै ते ९ जुलै दरम्यान भिकनी पाटील हे घरी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजाचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील तिजोरी तोडत त्यात ठेवलेले ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व ६ हजार रुपये रोख असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
भिकन विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.