बिबट्याची डांभुर्णी गावाजवळ हजेरी, खळ्यातील वासरावर मारला ताव.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी गावपरिसरातील उतावळी नदीच्या काठावर गोविंद विठ्ठल परदेशी यांच्या खळात बांधलेल्या एक वर्षे वयाच्या वासरावर बिबट्याने दिनांक १८ जून २०२३ चे रात्री हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज सकाळी गोविंद परदेशी हे गुरांना चारापाणी करण्यासाठी खळ्यात गेल्यावर उघडकीस आली आहे. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून डांभुर्णी, पिंप्री, अंबे वडगाव, पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.