पशुधन पालकांच्या मागणीनुसार म्हशींच्या बाजाराच्या जागेत बदल, पशुधन पालक व व्यापाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा. सभापती गणेश पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१०/२०२३

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर गणेश पाटील विराजमान झाल्यापासून त्यांनी शेतकरी व व्यापारी हितासाठी बरेचसे निर्णय घेत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपबाजार समिती मध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आत्ता नुकतेच वरखेडी येथील गुरांच्या बाजारात म्हशींचा बाजार उघड्यावर भरत असल्याने गाभण म्हशी तसेच दुभत्या म्हशींना उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने गाभण म्हैशींचा गर्भपात होणे, आजारी पडणे हे प्रकार घडत होते.

म्हणून आता म्हशींचा, शेळ्यांचा तसेच इतर गुराढोरांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सुरु असून संपूर्ण मार्केट यार्डात साफसफाईचे काम हाती घेतले आहे. तसेच मार्केट यार्डात मागील बाजूस असलेल्या झाडांखाली भरणाऱ्या शेळी बाजाराच्या जागेवर म्हैस बाजार व म्हैस बाजाराच्या जागेवर शेळी बाजार भरवण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली असून शेळ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी पत्र्याच्या शेड उभारण्यात आल्या आहेत म्हणून येत्या २६ ऑक्टोंबर २०२३ गुरुवार पासून वरखेडी गुरांच्या बाजारात शेळी बाजाराच्या जागेवर म्हैस बाजार व म्हैस बाजाराच्या जागेवर शेळी बाजार भरणार असल्याने पशुधन व्यापारी व पशुधन पालकांनी हा बदल लक्षात घेऊन आपली जनावरे विक्रीसाठी उभी करावीत असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी केले आहे. यावेळी उपसभापती पी. ए. पाटील व संचालक सुनील आबा उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या