श्री.गजानन महाराज सेवा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२०/११/२०२०
भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील श्री.वैष्णव परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री.गजानन महाराज सेवा गौरव पुरस्कार सोहळा गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक संदीप शेळके,समाजसेवक सुमित पंडित,नवोदित कवी किरणराजे कोथलकर,विष्णु महाराज सास्ते,दीपक महाराज मोरे, अशोकदादा गरुड,जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड,डॉ. सी.आर. तांदुळजे,ज्ञानेश्वर माऊली सेलूदकर,संग्राम देशमुख,प्रदीप जगताप,भुसारी बाबा,पत्रकार गोकुळ सपकाळ,दिलीप जाधव,शैलेश काकडे,श्याम सावळे,संजय लोखंडे,संजय कोथलकर,आर्यन इंगळे,विठ्ठल घायाळ,भास्कर कढवणे,जगन्नाथ बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात उद्योजक संदीप शेळके,समाजसेवक सुमित पंडित,त्यांची पत्नी पूजा पंडित,कवी किरणराजे कोथलकर यांना गजानन महाराज सेवा गौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुमित यांना प्रमाणपत्र,मानचिन्ह रोख रक्कम ५००१ रु असे या पुरस्काराचे स्वरूप होते.व्यसनमुक्त झालेल्या अनेकांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.या प्रसंगी परिसरातील अनेक गावांचे शेतकरी,महिला,व्यसनमुक्त झालेल्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी संगीता मिश्रिया,गणेश राजपूत,रामेश्वर वाघ यांनी आपला अनुभव व्यक्त करताना हा प्रवास कसा झाला हे आपल्या भाषणातून व्यक्त केले,तेंव्हा अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.समाजसेवक सुमित पंडित,संदीप शेळके,डॉ.तांदुळजे,अशोक गरुड,नवनाथ दौड यांची समायोजित भाषणे संपन्न झाली.अन्नदान केलेल्या ४९ जणांना मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वाघ यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर माऊली यांनी मानले.