जळगावच्या एस.एस.मणियार विधी महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराला सुरवात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२२
जळगाव येथील एस. एस. मणियार विधी विद्यालयातर्फे भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अमृतमहोत्सवचे निमित्ताने विद्यालयातर्फे स्वच्छ भारत अभियान ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ सोमवार ते २६ फेब्रुवारी २०२२ शनिवार पर्यंत विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचा शुभारंभ दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील स्वातंत्र्यवीर शहीद स्व. दीपक अनिल शिंदे यांचे वडील मा.श्री. अनिल हिलाल शिंदे व रा.से.यो.विभाग क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे संचालक मा.प्रा.डॉ. सचिन ज.नांद्रे सर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून एस.एस.मणियार विधी महाविद्यालय जळगावचे प्राचार्य मा.डॉ.बी. युवाकुमार रेड्डी, अंबे वडगाव येथील मा.श्री. सुनील वाघ, मा.श्री. भास्कर शिंदे, मा.श्री. विनायक शळके, मा.श्री. सतिष शिंदे, मा.श्री. प्रदिप सानप, सत्यजित न्यूजचे संपादक मा.श्री. दिलीप जैन. हे उपस्थितीत होते.
या शिबिराचे उदघाटन प्रसंगी सुरवातीला प्रमुख अतिथी मा.श्री.अनिल शिंदे, मा.प्रा.डॉ. सचिन नांद्रे सर, डॉ. सिरसागर सर कायदेतज्ज्ञ मा.श्री. मंगेशराव गायकवाड.(अंबे वडगाव), प्राचार्य मा.डॉ.श्री.बी.युवाकुमार रेड्डी, डॉ.डी.आर.शिरसागर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पी. पाहुजा यांनी केले तर आभारप्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मा.डॉ. योगेश महाजन यांनी केले. हा कार्यक्रम आरोग्य सेवा केंद्र क.ब.चौधरी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे संपन्न झाला. याप्रसंगी मान्यवरांनी शिबिरार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले.