[प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा दणका] पत्रकारांना अरेरावीची भाषा करणा-या अधिका-यांनी मागितली माफी .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२१
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव नगरपंचायतचे मुख्याधिका-यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मारेगाव तालुका सचिव सचीन मेश्राम यांना माझी बातमी का प्रकाशीत केली म्हणून अरेरावीची भाषा केली होती. ही घटना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांना समजताच सदर अधिका-यांशी संपर्क साधून आमच्या संघटनेच्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करण्याचे कारण विचारले असता त्या अधिका-यांनी दिलगिरी व्यक्त केली असून यापुढे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांना माझ्याकडून कोणताही त्रास होणार नाही हा शब्दही दिला आहे.
पत्रकारांना अरेरावीची भाषा करणा-या अधिका-यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड. व पदाधिका-यांनी धडा शिकवल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिका-यांनी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांचे अभिनंदन केले आहे.