ओबीसींच्या प्रश्नांसाठी धरणगाव येथे तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२०
राज्यातील ओबोसींच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे यासाठी धरणगाव येथे महात्मा फुले समता परिषदेने विविध ओबीसी समाजाच्या माध्यमातून तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की धरणगाव येथे विविध ओबीसी समाजाच्या संघटना, समाज अध्यक्ष व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते,समता सैनिक मोठया प्रमाणावर उपस्थित राहून दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण, पूजन, संविधानाचे वाचन व २६/११ च्या शाहीदांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. पायी चालत
तहसीदार धरणगाव यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले. सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, गुलाबराव वाघ, शालिग्राम मालकर, ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, लक्ष्मण पाटील, सुनील चौधरी, छोटू जाधव, पडोळ सर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार व्ही.टी. माळी यांनी व्यक्त केले. निवेदनात खलील मागण्या करण्यात आल्या.
१) मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. परंतु ते आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता काम नये.
२) ओबीसी संवर्गातील समाजाची जनगणना करण्यात यावी.
३) शैक्षणिक क्षेत्रात संवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण 100% सवलती लागू करण्यात यावी
४) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचे उत्पन्न मर्यादा वाढवावी.
५) मुलींची पहिली शाळा भरलेली भिडे वाडा पुणे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे.
या प्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, माजी आ. हरिभाऊ महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, समता परिषद जिल्हा निरीक्षक शाळीग्राम मालकर, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ओंकार महाजन, ऍड. वैशाली महाजन, शितल माळी, आरती शिंपी, समता परिषद तालुका अध्यक्ष धनराज माळी, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, महात्मा फुले युवा क्रांती मंच अध्यक्ष आर. डी. महाजन, माळी समाज सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, लहान माळी वाडा पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, सावता माळी युवक संघ अध्यक्ष विनायक माळी, निलेश महाजन, महात्मा फुले ब्रिगेड अध्यक्ष राजेंद्र महाजन, बहुजन क्रांती मोर्चा अध्यक्ष आबा वाघ, महाराष्ट्र माळी महासंघ अध्यक्ष नरेंद्र पाटील, गोरख देशमुख, पाटील समाज कोषाध्यक्ष लक्ष्मण पाटील, सोनार समाज अध्यक्ष बापू गणपत सोनार, नाभिक समाज अध्यक्ष अशोक झुंझारराव, सतिष बोरसे, धोबी समाजाचे जिल्हा संघटक छोटू जाधव, तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, शहर युवा अध्यक्ष विनोद रोकडे, कासार समाज अध्यक्ष हरिश्चंद्र भावसार, भावसार समाज अध्यक्ष चंद्रकांत भावसार, क्षत्रिय खत्री समाज अध्यक्ष पडोळ, शिंपी समाज तालुका अध्यक्ष जितेंद्र जगताप, किरण सोनवणी, बडगुजर समाज अध्यक्ष मनोहर बडगुजर, चौधरी समाज अध्यक्ष सुनील चौधरी, नितीन चौधरी, राजेंद्र ठाकरे, भरत चौधरी, भाजपा गटनेते कैलास माळी, सुरेश महाजन, विजय महाजन, भागवत चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप महाजन, माजी नगरसेवक मधुकर रोकडे, भटूलाल महाजन, ऍड. शरद माळी, नाना महाराज, रवि महाजन, देवरे आबा, कांतीलाल माळी, गोपाळ माळी, सुनिल चौधरी, पी. डी. पाटील, हेमंत माळी, रवि बाविस्कर, जयेश महाजन योगेश माळी, परमेश्वर महाजन व मोठया संख्येने ओबीसी समाज उपस्थित होता.