पाळधी येथील समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना “महात्मा गांधी” दर्शन पुरस्कार जाहीर
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२०
जळगाव जिल्ह्यात माणुसकी ग्रुप स्थापन करून निस्वार्थ सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर
आनंदश्री ऑर्गेनाजेशन आय टी एज्यूकेशन ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय २०२० “महात्मा गांधी” दर्शन पुरस्कार या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या पाळधी तालुका जामनेर हल्ली मुक्काम लोहारा ता.पाचोरा येथील माणुसकी ग्रुपचे जळगाव जिल्हा अध्यक्ष समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना महात्मा गांधी दर्शन पुरस्कार जाहीर करन्यात आला आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समितीने पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडपत्राद्वारे कळविले आहे..ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व आकर्षक प्रमाणपत्र व गांधी सन्मानचिन्ह देऊन मुबई येथे १०/१०/२०२० रोजी गौरवण्यात येणार आहे.
लॉक डाऊन च्या काळात त्यांनी आपला जीव धोक्यात घालून जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिरे,मनोरुग्ण सेवा, आरोग्य सेवा, अन्नधान्य वाटप, मास व सुरक्षा किट वाटप केले होते, हे कार्य करीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती,व रक्तदान शिबिर घेण्यासाठी धावपळ करीत असताना अपघात सुद्धा झाला होता. तरीसुद्धा त्यांचे कार्य जोमात सुरू आहे. ह्या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना महात्मा गांधी दर्शन पुरस्कार जाहीर करन्यात आला आहे.
महात्मा गांधी दर्शन पुरस्कार मिळा्ल्याने समाजसेवक गजानन क्षिरसागर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.