महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनांतर्फे अभिवादन.
चेतना हिरे.(वरखेडी)
दिनांक~११/०४/२०२३
आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने विविध संघटनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. ता निमित्ताने विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाचे सचिव मा. श्री. एम स टी. लुले. यांच्याहस्ते जळगाव येथील महात्मा जोतिबा फुले मार्केटमधील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा तसेच जय जोती, जय क्रांती अश्या घोषणा देत जयघोष करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुरवातीला जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या वन टाईम राज्यव्यापी कार्यक्रमाची माहिती दिली. तदनंतर प्रचारक रवींद्र तितरे यांनी महात्मा जोतिबा फुले रचित सत्यशोधक समाजाची प्रार्थना उपस्थित फुले प्रेमींकडून सामुदायिकपणे म्हणून घेतली.
अभिवादन कार्यक्रमास देवकाई प्रतिष्ठान जळगावचे अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे, विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ जळगावचे उपाध्यक्ष निलेश सोनवणे, खजिनदार मनोहर रुले, अथर्व प्रकाशन जळगाव प्रतिनिधी सुनिल पाटील तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे क्रियाशील कार्यकर्ते हितेंद्र धांडे सर त्याचप्रमाणे कवयित्री नीता विसावे, तुकाराम विसावे सर, कार्यकर्ते चंद्रकांत थोरात आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन हेमंत धांडे सर व आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले.