कुऱ्हाड खुर्द येथे सुदृढ बालक पोषण आहार सप्ताह प्रदर्शन संपन्न.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२८/०९/२०२२

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे श्री. हनुमानजी मंदिरावर एकात्मिक बाल विकास सेवा अभियाना योजनेअंतर्गत पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला. यात कुऱ्हाड बीट मध्ये पाचोरा तालुक्यातील २४ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या पोषण आहार प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.

पोषण आहार सप्ताहचे उद्घाटन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पाचोरा जिजाबाई राठोड, सरपंच संगीता ताई भगत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी महिला व स्वास्थ, बालक व शिक्षण या गोष्टींना चालना देण्यासाठी तसेच लहान बालकांना सुदृढ बनण्यासाठी किंवा कुपोषण मुक्त करण्यासाठी तसेच आदिवासी भागातील महिला वर्गासाठी पारंपरिक खाद्य पदार्थ तसेच विविध सकस पदार्थाचे प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते.

तसेच दैनंदिन आहारामध्ये शिजवलेले अन्न व्यवस्थित खावे, पालेभाज्या, कडधान्ये, फळे यांचा आहारात समावेश केल्याने बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो असा मौलिक सल्ला मान्यवरांनी उपस्थित पालक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिला. तसेच गावातील अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या लहान मुलांमध्ये वीस मुले कुपोषण सदृश्य आढळून आले. यांना कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत तर्फे ग्राम निधीच्या दहा टक्के निधीतून या बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच संगीता भगत, ग्रामपंचायत सदस्या कमलबाई बोरसे, सोनाली तेली, ग्रामविकास अधिकारी रमेश महाजन, शिक्षक संजय काळे, शिपाई अशोक बोरसे, पर्यवेक्षिका नंदा कोतवाल व महाले मॅडम यांनी उपस्थिती दिली. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी कुऱ्हाड येथील एकूण सहा अंगणवाडीतील सेविका शोभा महाजन, प्रतिभा तेली, सुरेखा पाटील, मंगला पाटिल, सुरेखा गोरे, मंजुषा दोडके व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

ब्रेकिंग बातम्या