येत्या ०५ फेब्रुवारीला आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी गुरु यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी, गोवर्धन जाधव यांचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२३
उद्या दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी श्री. संत गुरु रविदास महाराज यांची जयंती असल्याकारणाने पाचोरा तालुक्यातील सर्व चर्मकार बंधु, भगिनींनी श्री. संत गुरु रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन आपले रापीशी असलेले नाते घट्ट करायचे आहे. म्हणून यानिमित्ताने प्रत्येक चर्मकार बांधवांनी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी सकाळी आपापल्या घरात किंवा गावागावांतील सर्व चर्मकार बंधु भगिनींनी एकत्र येऊन प्रतिमापूजन करुन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश ज्योत टाकून तसे वागण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पाचोरा तालुक्याचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ नन्नवरे, सचिव सुपडू सावंत, तालुका युवा अध्यक्ष रमेश पवार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नाथेकर, सचिव गणेश ननावरे, तालुका कर्मचारी आघाडी आमचे मार्गदर्शक गव्हाळे सर, अहिरे सर, विसावे आप्पा, सर्व तालुक्यात कार्यकारणी व ग्रामीण कार्यकारणी शहर कार्यकारणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका यांनी केले आहे.