जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील पहिल्या रिक्षाचालक कु. आशा भुजंगे ह्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२३
सद्यस्थितीत महिलांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत असून कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी स्वता संघर्ष करावा लागत आहे. अशीच एक संघर्षमय जीवन जगणारी तरुणी कु. आशा भुजंगे हिने आपल्या आईवडिलांचा सांभळ करण्यासाठी कुठेही लाचारी न पत्कारता किंवा नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा पाचोरा शहरात ऑटो रिक्षा चालवून प्रवासी वाहतूक करुन दोन पैसे कमावण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. ह्या कु. आशा भुजंगे पाचोरा शहरातीलच नव्हे तर पाचोरा, भडगाव तालुक्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक ठरल्या आहेत. याची दखल घेत दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी सत्यजित न्यूज ने कु. आशा भुजंगे यांची भेट घेऊन मा. श्री. सुधाकर महाजन, मा. श्री. पप्पू राजपूत यांच्या उपस्थितीत सर्वात प्रथम सत्कार करुन प्रोत्साहित केले होते.
याचीच दाखल घेत आज ०८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी कु. आशा भुजंगे यांना पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ भवन येथे बोलावून घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. तसेच पाचोरा तालुक्यातील अश्याच काही महिला, तरुणी आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत असतील व त्यांना काही अडीअडचणीला सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन करत योग्य ती मदत करण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे सांसांगितले आहे.