पाचोरा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२३
आज पाचोरा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तिथीनुसार दिनांक १० मार्च २०२३ शुक्रवार रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्वजनिक जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी पाचोरा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली.
“यावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी”
यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशहितासाठी केलेल्या कार्याला उजाळा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याला उजाळा देत या थोर पुरुषांचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत हे पटवून देत श्री. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व इतर राष्ट्रपुरुषांची ओळख व पुजन फक्त जयंतीनिमित्त केले जाते अशी खंत व्यक्त करत या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्याचे जीवनचरित्र वाचून त्यांना डोक्यात घेतले तर नक्कीच आपला देश जगात आघाडीवर असेल असे ठामपणे सांगत आजचा तरुण वर्ग शिक्षण सोडून फॅशनच्या व व्यसनाच्या आहारी जाऊन स्वताचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासह देशाचे वाटोळे करत आहे. तरुण, तरुणींनी या महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन व्यसनापासून दुर राहुन आपसातील मतभेद व जातीपातीच्या भिंती तोडून राष्ट्रहित जोपासले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या जन्मोत्सव सोहळ्याचे वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, माजी जिल्हाप्रमुख ॲड. मा. श्री. अभय दादा पाटील शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा, तालुकाप्रमुख मा. श्री. शरद पाटील, उपजिल्हा संघटक मा. श्री. विनोद बाविस्कर, उपजिल्हा समन्वयक मा. श्री. धर्मराज पाटील, तालुका संघटक मा. श्री. देवीदास पाटील, तालुका समन्वयक मा. श्री. ज्ञानेश्वर पाटील, मा. श्री. श्री.अनिल सावंत व शहरप्रमुख मा. श्री. दिपक पाटील, मा. श्री. दत्ताभाऊ जडे व राजेंद्र राणा (शहर संघटक,पाचोरा), श्री. दादाभाऊ चौधरी व मा. श्री.बंडु मोरे (शहर समन्वयक), मा. श्री.आनंद संघवी, मा. श्री. भरत खंडेवाल, मा. श्री. अरुण तांबे, मा. श्री. श्री. संजय चौधरी, मा. श्री. जितेंद्र जैन, मा. गफार भाई, मा. श्री. फ़हीम शेख़, मा. श्री. मिथुन वाघ, मा. श्री. खंडू सोनवणे, मा. श्री. अभिषेक खांडेलवाल, मा. श्री. नितिन लोहार, श्री. पपु जाधव, श्री. बबलू भोई, श्री. हेमंत पाटिल, श्री. नानाभाऊ रिक्शावाले, श्री. अतुल चौधरी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्री. जीभाऊ पाटील, उपजिल्हा संघटक सौ. तिलोतमा ताई मौर्य, श्री. संदीप जैन, भुपेश सोमवंशी, श्री. पपु राजपूत, श्री. विनोद राउळ, हरीश देवरे, प्रशांत सोनार, गौरवपाटील, जगदिश महाजन, पप्पू जाधव, अजय पाटिल, प्रतीक पाटील चंद्रकांत पाटील, श्री. शशिकांत बोरसे, श्री. प्रीतेश जैन, श्री. रोहन राजपूत, श्री. कडू पाटील, श्री. मुकेश राजपूत, श्री. किरण राजपूत, श्री. सागर पाटिल, श्री. आबा देसले, श्री. लोकेशपाटील, निलेश गवळी, सचिन तेली, विशाल पाटील, ओमपाटील, रूपेश पाटील, तिलोतमा ताई येवले, सौ. जयश्री ताई, सौ. अनिता ताई, सौ. कुंदन पण्ड्या, सौ. पारोचेताई आदि पदाधिकारी मान्यवर व असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.