न गीता बुरी है, न कुरआन बुरा है न हिन्दू बुरा है, न मुसलमान बुरा है, न खुदा बुरा है, न भगवान बुरा है भेजे में जो घुसा है, वो शैतान बुरा है. वरखेडी येथे आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त मोफत चहाचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०६/२०२३
आज आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोघ सण एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या सणिनिमित्ताने सकाळपासूनच एका बाजूला मंदिरात टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाचा विठ्ठल नामाचा गजर सुरु होता तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांच्या मशिदीच्या दोन्ही क्षेपणातून पवित्र आजाण ऐकायला येत होती. तसेच हिंदू, मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत होते.
आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण, उत्सव एकाच दिवशी आल्यामुळे मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या दिवशी कुर्बाणी न करण्याचा निर्णय घेऊन हिंदू, मुस्लिम एकतेचे नाते दृढ असल्याचे सिद्ध करुन दिले. विशेष म्हणजे हिंदू बांधव व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा तर दिल्याच तर काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांच्या वारीत सामील होऊन विठ्ठल नामाच्या गजरात टाळ, मृदंगाच्या तालावर ठेका धरुन मनमुरादपणे आनंद लुटला व ठिकठिकाणी मोफत चहापान व ठराळाचे वाटप केले.
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील “जय भोले ग्रुप” तर्फे वरखेडी बसस्थानक परिसरात हिंदू, मुस्लिम बांधवांसाठी सकाळपासूनच मोफत चहाचे वाटप करण्यात आले. हे मोफत चहाचे वाटप करण्यासाठी जय भोले ग्रुपचे पवन पाटील, भावेश पाटील, बंन्टी पाटील, अरुण पाटील, मंगेश पाटील, धनराज पाटील, भिमा पाटील, प्रकाश मोची, विश्वनाथ पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला तर पवन पाटील, भावेश पाटील, अशोक पाटील व बंन्टी पाटील यांनी दुध, साखर, चहाचा तर प्रकाश मोची यांनी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक भार उचलला.
या मोफत मोफत चहा, पाण्याच्या वाटपासाठी मुस्तकीम अब्दुल कहाकर, महेमूद हलवाई (काली, पीली वाले), सलीम कहाकर, रज्जाक कुरेशी, कदिर शरेशी यांनी दिवसभर थांबून रस्त्यावरुन जाणाऱ्या येणारे यात्रेकरु, मुस्लिम बांधव व वाटसरुंना शुध्द पाणी व चहाचे वाटप केले.
(आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोघह सण एकाच दिवशी आल्यामुळे काल रोजी भोकरी येथील मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बाणी न देण्याचा निर्णय घेऊन हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.)