वैद्यकीय क्षेत्रातील देव माणूस डॉ.सागर दादा गरूड, वाकोद येथील तरूणावर स्वखार्चाने केली मोफत शस्त्रक्रिया.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०९/२०२२
डॉक्टर म्हणजे एक देवदूतच असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतांना बऱ्याचशा घटनांमध्ये बरेचसे प्रसंग असे येतात कि साक्षात यमदूत दारावर येऊन उभा ठाकलेला असतो. परंतु आपल्याकडे आलेल्या रुग्णांना जीवदान कसे देता येईल याकरिता डॉक्टर मंडळी अटोकाट प्रयत्न करुन रुग्णांना पुनर्जीवन मिळवून देतात त्याला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढतात म्हणून डॉक्टर म्हणजे देवदूतच असतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील विघ्नहर्ता हॉस्पिटल म्हणजे नावाप्रमाणेच विध्न दुर करणारे हॉस्पिटल ठरत आहे. आजपर्यंत बऱ्याचशा गोरगरिबांच्या उपचारासाठीचा खर्च न घेता मोफत ऑपरेशन, मोफत तपासणी, मोफत औषधोपचार करुन डॉ. सागर दादा गरुड, डॉ. भुषण दादा मगर व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी आजपर्यंत बऱ्याचशा रुग्णाचे जीव वाचवले आहेत. तसेच कोरोणा काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून लांब राहून रुग्णसेवा केली आहे.
अशीच रुग्ण सेवा करत असतांनाच डॉ. सागर दादा गरुड यांना जामनेर वाकोद येथील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. विशाल जोशी यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की वाकोद येथील भूमिहीन शेतमजूर अत्यंत आल्याच्या परिस्थितीत मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह चालवणारा सलीम तडवी याच्या पायाला दुखापत झालेली आहे. तो मागील आठवडाभरापासून सुजलेला पाय घेऊन फिरतो आहे. त्याच्याजवळ उपचारासाठी पैसे नसल्याने त्याच्या पायावर उपचार करणे गरजेचे आहे असे सांगितले डॉ. सागर दादा गरुड यांनी संपूर्ण हकिकत जाणून घेत तुम्ही सलीम याला त्वरित हॉस्पिटलमध्ये पाठवा बिलाचे काय ते बघून घेऊ तुम्ही चिंता करु नका असे सांगितले.
सलीम तडवी हा दवाखान्यात आल्यावर डॉक्टर सागर दादा गरुड यांनी सलीमच्या पायाचा एक्सरे काढला व एक्सरे काढल्यानंतर असे लक्षात आले की पायावर शस्त्रक्रिया केल्याशिवाय सलीमचा पाय व्यवस्थीत होणार नाही म्हणून ऑपरेशनची तयारी सुरु झाली. सलीमचे ऑपरेशन एखाद्या योजनेतून करता येईल का ? याकरिता पडताळणी करून पाहाण्यात आली. परंतु सलीम कोणत्याही योजनेत बसत नव्हता हे माहीत पडताच सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. विशाल जोशी चिंतेत पडले त्यांनी डॉ. सागर दादा गरुड यांना विनंती केली की सलीमच्या पायावर वेळीच उपचार नाही झाले तर तरुण वयात त्याला खुपच अडणीच येतील आता तुम्हीच काहीतरी करा अशी विनंती केली. सलीमची हालाखीची परिस्थिती पाहून व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. विशाल जोशी यांची तळमळ पाहून डॉ. सागर दादा गरुड यांनी सलीमला पाचोरा येथील विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये बोलावून घेत स्वखर्चाने शस्त्रक्रिया व औषधोपचार करुन दिल्यामुळे आज सलीम हा स्वताच्या पायावर उभा राहून चालु लागला आहे.
डॉ. सागर दादा गरुड खरच देव माणूस (मा. श्री. विशाल जोशी)
डॉ. सागर दादा गरुड खरच देव माणूस आहे. दादांनी सलीम याच्या पायाचा मोफत एक्सरे काढल्यानंतर कोणताही मोबदला न घेता मोफत ऑपरेशन व औषधोपचार करुन दिल्यामुळे आज सलीम मोठ्या संकटातून बाहेर आला आहे. खरच डॉ. सागर दादा गरुड देव माणूस आहे असे विशाल जोशी यांनी सांगितले यावेळी जोशी भावनिक झाले होते. डॉ. सागर दादा गरूड यांनी केलेल्या या मदतीबद्दल वाकोद ग्रामस्थ, शांताई फाउंडेशन यांनी आभार मानले आहेत.