कोल्हे धरणातून दिवसाढवळ्या पाणी चोरी, कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या कोल्हे गावाजवळ नांदोळ नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलसाठ्यातून विद्युत मोटारीच्या साह्याने दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करुन ते पाणी शेतीसाठी तसेच शेततळे व विहिरी भरण्यासाठी केला जात असल्याने भविष्यात कोल्हे, माळेगाव पिंप्री, अटलगव्हान, डांभुर्णी (पिंप्री) या गावांच्या पिण्याच्या पाणाचा प्रश्न उपस्थित होऊन पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल तसेच मालखेडा खुर्द, मालखेडा बुद्रुक, कोल्हे, डांभुर्णी, पिंप्री, अटलगव्हान, माळेगाव पिंप्री या गावातील पाळीव गुरारांना तसेच जवळच असलेल्या मालखेडा राखीव जंगलातील वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध रहाणार नाही व सगळ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी चिन्हे दिसत असल्याने कोल्हे धरणातून सुरु असलेली पाणीचोरी त्वरित थांबवावी अशी गावागावातून मागणी जोर धरत आहे.
कोल्हे धरणात जेमतेम असलेला जलसाठा
पाणी चोरी व विद्युत चोरी करणारे म्हणतात आम्ही हप्ते देतो ~
कोल्हे धरणातून पाणी उपसा करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक असतांनाही अशी कोणतीही परवानगी न घेता जलपरी विद्युत पंप घेऊन स्वयंमचलित म्हणजे ऑटो स्विच करून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी सुरू आहे. जेवढा वेळ विद्युत पुरवठा सुरु तेवढा वेळ मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने कोल्हे धरणातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असून वेळेस पावसाला सुरुवात न झाल्यास वरील गावातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच कोल्हे धरणातून पाणी चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत पंपासाठी अधिकृतपणे विद्युत कनेक्शन घेणे गरजेचे असल्यावरही असे कोणतेही अधिकृत विद्युत कनेक्शन न घेता थेट विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु आहे.
याबाबत संबंधित पाणी चोरी ही पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्युत चोरी ही विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यातून संबंधित अधिकारी व कर्मचारी हप्ते घेऊन पैसा कमावत असल्याचे बोलले जाते जर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हप्ते घेत नसते तर आतापर्यंत यांच्यावर कारवाई झाली असती असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
टिप ~ असाच प्रकार अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या म्हसाळा म्हणजे (कोकडी) धरणातून सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.