पत्रकार श्री. विलास हिवाळे व श्री. राजेंद्र निकम यांनी घेतली, कळमसरा येथील पीडित कुटुंबीयांची घेतली भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला गावातीलच ५ ते ६ मुलांनी अचानकपणे उचलून नेत शेतात घेऊन गेले व तेथे त्यांनी तीला जीवे मारण्याची धमकी देत त्या मुलीवर जोर, जबरदस्तीने अत्याचार केले व ही हकीकत कुणालाही सांगीतल्यास याद राख अशी धमकी देऊन सकाळी, सकाळी तिन विजेच्या सुमारास त्यांनी तीला महिलांच्या शौचालयाजवळ सोडून ते पळून पळ काढला या माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यापासून परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पंचक्रोशीतील गावातून व महाराष्ट्रभरातून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली जात आहे.
या घटनेची दखल घेत सिल्लोड येथील दक्ष पोलीस टाईम्सचे राज्य सल्लागार मा. श्री. विलास हिवाळे व दक्ष पोलीस टाईम्सचे राज्य प्रतिनिधी मा. श्री. राजेंद्र निकम यांनी कळमसरा गावात भेट देऊन पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी साधकबाधक चर्चा करुन घटनेची माहिती जाणून घेतली. व आम्ही सर्व पत्रकार व दक्ष पोलीस टाईम्सचा परीवार आपल्या सोबत आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर अर्जफाटे करुन तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
याची दखल घेत सिल्लोड येथील दक्ष पोलीस टाईम्सचे राज्य सल्लागार मा. श्री. विलास हिवाळे व दक्ष पोलीस टाईम्सचे मा. श्री. राजेंद्र निकम