पाचोरा येथे आज युवा व्याख्याते गणेश शिंदे यांचे जाहीर व्याख्यान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०८/२०२३
पाचोरा येथील महापुरे मंगल कार्यालयात आज दुपारी तीन वाजता युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ते पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहे. या व्याख्यानाचे आयोजन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले आहे.
आम्ही सारे जण भारतीय आहोत. भारतीय संस्कृती व अस्मिता अद्वितीय आहे. या पवित्र भूमीत अवतार पुरुष झालेत, संत महात्मे, थोर महापुरुषांचा आदर्श आहे. पवित्र धर्मग्रंथातून आली. उच्चसंस्कार, न्याय, निती, धर्म, निती मूल्यांचा, मार्गदर्शनाचा अनमोल ठेवा आहे. पवित्र नातेसंबंध, एकोपा, प्रेम, जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी, मानवता, सदाचार, आमच्या पूर्वजांनी समाजात मानवता सदाचार चांगुलपणा वाढीस लागावा. भरकटलेले जीवन सावरावे. या मंगल हेतूने सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, पाचोरा भडगाव यांच्या वतीने युवा व्याख्याते गणेश शिंदे यांचे जाहीर व्याख्यान शनिवार २६ रोजी दुपारी ३ वाजता महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या सत्कार्यासाठी आपल्या परिवारासह उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.