उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी, तुम्हीही लावा हजेरी, आ. मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांची हाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
११/०९/२०२३
उद्या शासन आपल्या दारी या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार व देवेंद्र फडणवीस साहेबांची उपस्थिती लाभणार आहे. तरी पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांचा १२ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व जळगाव येथून हेलिकॉप्टरमधून मौजे हडसन १२, १५ मिनिटांनी हडसन येथून साडेबारा वाजता पाचोरा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमस्थळी एम. एम. कॉलेज येथे हजर होणार असून याठिकाणी जनतेशी संवाद साधुन शासन आपल्या दारी योजनेची अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जनहितार्थ केलेली कामे व भविष्यात काय योजना राबवण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती देतील.
तदनंतर दुपारी अडीच वाजता मोटारीने नांद्रा येथील नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन तसेच नांद्रा येथुनच
नगरदेवळा रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम. आय. डी. सी.) पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतन मुख्य इमारतीचे ई भूमिपूजनानंतर साडेतीन वाजता मोटारीने परत हडसन येथील हेलिपॅडकडे प्रस्थान, दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी हेलिकॉप्टरमधून जळगाव विमानतळावर व लगेचच चार वाजता शासकीय विमानाने मुंबईला परत जाणार आहेत. अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.