कासमपूरा वि.का.सह.सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. दिलीप राजपूत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील कासमपुरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमपदाची निवडणूक माजी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच घेण्यात आली.
या चेअरमपदाचे निवडणूकीत चेअरमनपदी मा.श्री.दिलीप शांतीलाल राजपूत यांची सर्वानुमते चेअरमनपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी मा.श्री.धनराज परदेशी व संचालक मा.श्री.संदीप बाबुलाल राजपुत, मा.श्री. राजेंद्र रामलाल महेर, मा.श्री. गोपाल परदेशी, राजेंद्र पांडे, मा.श्री. नामदेव शिंदे, सौ. मालताबाई हिरालाल परदेशी, मा.श्री. विजय मोहेन परदेशी, या.श्री. यशवंत केशव हटकर, मा.श्री. राजेंद्र लक्ष्मण कोळी, या.श्री. गोविंद विठ्ठल खरे, सौ. कविता गोपाल परदेशी हे संचालक संचालीका उपस्थीत होते. या नवनिर्वाचित चेअरमन व सर्व संचालकांचा सत्कार माजी जिल्हापरिषद सदस्य या.श्री. भाऊसाहेब दिपकसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रू सचिव श्री.दिलीप पाटील हे उपस्थीत होते. निवडणुक कामी श्री.भागवत पाटील यांनी अथक परिश्रम घेत कामकाज पाहिले.