दोन दिवसांच्या विशेष लसिकरण मोहीमेचा पाचोरेकरांनी लाभ घ्यावा. नगराध्यक्ष संजय गोहिल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२१
राज्यामध्ये नविन व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता १८ वर्षावरील सर्व नागारीकांचे लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी जळगांव यांच्या सुचनेनूनसार शहरातील ज्या नागरीकांचा पहीला डोस बाकी असेल व दुसरा डोस प्रस्तावीत असेल अशा नागरीकांकरीता कोवीड -१९ लसीकरणाकरीता कृती आराखडा तयार करुन विशेष शिबीराचे आयोजन शहरातील विविध भागात १० व ११ डिसेंबर असे दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपावेतो आयोजित करण्यात आलेले असुन याचा पाचोरेकरांनी लाभ घ्यावा असे अवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
या दोन दिवसांच्या विशेष शिबिरात पहिल्या दिवशी १० डिसेंबर आरोग्य केंद्र बाहेरपुरा , ग्रामीण रुग्णालय , सु.भा.पाटील,विद्या मंदिर, देशमुखवाडी, डी.एम.पाटील शाळा त्रंबक नगर , शिव मंदिर, सिंधी कॉलनी,जि.प.शाळा शिवाजी नगर जारगांव चौफुली,गणेश मंदिर, कृषी कॉलनी या भागात लसिकरण सेवा सुरू राहणार आहे.तर दुसर्या दिवशी11 डिसेंबर रोजी आरोग्यकेंद्र बाहेरपुरा, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, त्रंबक नगर, मिठाबाई कन्याशाळा ,शिवतिर्थ, भडगांवरोड , तलाठी कॉलनी, साई मंदिर,आदर्श नगर संजय गोसावी यांचे घराजवळ लसिकरण सेवा सुरू राहणार आहे. तरी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी स.सदस्य, न.पा.पाचोरा, सामाजीक संस्था, प्रतिष्ठित नागरीक, धर्मगुरु, सामाजीक कार्यकर्ते यांनी वरील प्रमाणे नमुद ठिकाणी नागरीकांना उपस्थित राहणेकामी प्रोत्साहीत करावे व जास्तीत जास्त लसीकरणाचे उध्दीष्ट पुर्ण होणेकामी सहकार्य करावे असेही आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.