न्यायालयासमोर गौरक्षक हेमंत गुरव यांच्या प्रकरणात मानवी हक्क आयोगाने निष्कर्ष नोंदवल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याचे पितळ उघडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०७/२०२३
गुरांच्या अवैध वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी चुकीच्या पध्दतीने कारवाई त्यांच्याच अंगलगट आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील गौरक्षक मा. श्री. हेमंत गणेश गुरव यांनी सन २०२२ मध्ये अवैधरित्या अमानुषपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर कायदेशीर कारवाई करते अत्यावश्यक व क्रमप्राप्त असतांनाही पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी गुन्हा दाखल करुन गुरांच्या अवैध वाहतूकीच्या गुन्ह्यांमध्ये प्राणी संरक्षण कायदा १९६०, १९९७, नवीन कायदा कलम २०१४ व २०१७ नुसार कारवाई न करता कायद्याचे उल्लंघन करुन पोलीसांना अधिकार नसतांना मनमानी व चुकीच्या पद्धतीने कारवाई करून सदरील पकडलेली गुरे ही सबंधित आरोपीच्या ताब्यात देत सोडून दिली होती.
म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांच्या विरोधात गौरक्षक हेमंत गणेश गुरव यांनी मुंबई मानवाधिकार न्यायालयात प्रकरण दाखल करुन दादा मागीतली होती. याप्रकरणी मुंबई मानवाधिकार न्यायालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे केंद्र व राज्य शासनाने प्राण्यांच्या वाहतूकीबाबत तसे कायदे केले नसल्याचे सांगितले असता हे उत्तर ऐकून न्यायालयाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांची अकार्यक्षम व वादग्रस्त असल्याचा ठपका ठेवत ज्यांना कायद्याचे प्राथमिक ज्ञान नाही, ज्यांना विचारलेल्या प्रश्नांची निट उत्तरे देता येत नाहीत अशा अश्या अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक नियुक्ती करतातच कशी असा प्रश्न उपस्थित करत ही आश्चर्याची बाब आहे असे नमूद केले असल्याची माहिती याचिकाकर्ते हेमंत गणेश गुरव यांनी सत्यजित न्यूजला दिली आहे.
तसेच मानवाधिकार न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. के. के. तातेड साहेबांनी गोरक्ष हेमंत गणेश गुरव यांच्या बाजूने निकाल देत कायद्यात कसूर केल्याबद्दल पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांना दहा हजार रुपये (१००००/००) दंड आकारणी करुन दंडाची रक्कम तक्रारदार हेमंत गुरव यांना देण्यात यावी असे आदेश दिले. तसेच पुढील तारखेला सुनावणी दरम्यान स्वता पोलीस अधीक्षक यांनी स्वता न्यायालयात उपस्थित रहावे किंवा कायद्याचे ज्ञान असलेल्या सक्षम अधिकाऱ्यास उपस्थित करावे अशा सूचना दिल्या असल्याची माहिती याचिकाकर्ते गौरक्षक हेमंत गुरव यांनी सत्यजित न्यूज कडे दिली आहे.