वाकोद येथील राजु शिरसाट हे घरातून निघून गेले आहेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०५/२०२३
जामनेर तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या वाकोद येथील राजु भागवत सिरसाठ वय वर्षे ३५ हा इसम १६ मे २०२३ मंगळवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरात कुणालाही, काहीही न सांगता निघुन गेला असल्याची खबर राजु भागवत याचे वडील भागत देवराम शिरसाट वय वर्षे ६५ यांनी दिनांक १८ मे २०२३ गुरुवार रोजी पहुर पोलीस स्टेशनला दिली आहे.
या खबरी वरून राजु भागवत सिरसाठ हा हरवल्याची नोंद करण्यात आली असून घरातून निघून गेलेल्या राजुची उंची पाच फूट, पाच इंच, रंग निमगोरा, शरीराने सडपातळ, चेहरा लांबट, गोल, केस काळे, बारीक मिशी, नाक सरळ, अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट व तपकिरी रंगाची पॅच घातलेली असून डाव्या हाताच्या मनगटावर ओम असे गोंदवले आहे.
अश्या वर्णनाची व्यक्ती कुठेही कोणालाही आढळून आल्यास दुरध्वनी ८३०८८०५२०१ व ९९२३८७९६३७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साॊ. मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी केले आहे.