करड्या कंठाची पांगळी (Gray-throated Martin) हा पक्षी जळगाव जिल्हात आढळून आल्याची पक्षीमित्र मा. श्री. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली माहिती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२३
करड्या कंठाची पांगळी (Gray-throated Martin) हा पक्षी जळगाव जिल्हात प्रथमच आढळून आल्याची माहिती पक्षीमित्र मा. श्री. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी सत्यजित न्यूजला नुकतीच दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देतांना पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ व शिल्पा गाडगीळ यांनी सांगितले की आम्ही दिनांक ३१ मे २०२३ बुधवार रोजी यावल रस्त्यावरील शेळगाव पाटबंधारे विभागाचे परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. तेव्हा आम्हाला ही करड्या रंगाची पांगळी दिसून आली तेव्हा ही पांगळी साधी पांगळी (Plain Martin) असावी असे वाटले होते. परंतु मनात शंका असल्याने घरी आल्यावर निट निरिक्षण केल्यावर ही साधी पांगळी नसल्याचे लक्षात आले म्हणून ही कोणत्या जातीची पांगळी आहे हे याची पडताळणी करण्यासाठी आम्ही (eBird) निरीक्षकांकडे पाठवून माहिती जाणून घेतली तेव्हा हा पक्षी साधी पांगळी (Plain Martin) या पक्षाची उपजात असून करड्या कंठाची पांगळी (Grey-throated Martin) या नावाने हा पक्षी ओळखला जातो अशी माहिती समोर आली असून हा पक्षी जळगाव जिल्ह्यात प्रथमच आढळून आल्यामुळे आम्ही खात्री करून घेण्यासाठी दिनांक १५ जून २०२३ गुरुवार रोजी यावल रस्त्यावरील शेळगाव पाटबंधारे विभागाच्या परिसरात पुन्हा भेट देऊन पाहणी केली व बारकाईने अभ्यास केल्यावर हा पक्षी
करड्या कंठाची पांगळीच (Grey-throated Martin) आहे याची आम्हाला खात्री झाल्यावर लगेचच याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सत्यजित न्यूजला दिली आहे. तसेच रिचर्ड ग्रीमिटच्या नव्या आवृत्तीत पुस्तकात हा पक्षी नव्याने समाविष्ट करण्याची गरज आमच्या लक्षात आल्याचे गाडगीळ म्हणाले.
तसेच करड्या-कंठाची पांगळी ही शेतजमीन, गवताळ प्रदेश आणि सवाना यांसारख्या खुल्या अधिवासात आढळतात, या
सहसा पाण्याजवळ प्रामुख्याने संथ वाहणाऱ्या नद्या, तलाव, ओले गवताळ प्रदेश आणि इतर पाणथळ अधिवासाच्या आसपास आढळततात. या बहुतेक वेळा हवेत दिसतात परंतु प्रजनन काळात कधी, कधी तारांवर किंवा जमिनीवर किंवा उंच कडांवर बसलेले असतात. अन्य पांगळी, पाकोळी (Martin/Swallow) प्रमाणे हा उडता उडता किडे खातो. ही पांगळी हे ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतीय उपखंडापासून दक्षिण चीन, तैवान आणि उत्तर फिलीपिन्सपर्यंत आढळत असून भारतात गुजराथ, राजस्थान मध्ये ते पूर्व भारत या प्रदेशात मुख्यत्वे आढळते महाराष्ट्रातही काही जिल्ह्यातही हे आढळून येत असल्याची माहिती पक्षीमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी सत्यजित न्यूजला दिली आहे.