नामांकित विमा कंपनीकडून कुऱ्हाड येथील वाहन धारकाची फसवणूक केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने रोजीरोटीसाठी आर्टिका कंपनीची गाडी घेऊन ती भाडेतत्त्वावर चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. संबंधित तरुणीने आर्टिका ही गाडी कर्ज घेऊन हप्त्याने नवीनच घेतली होती.
परंतु दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी आर्टिका गाडीचे मालक सचिन संजय क्षीरसागर हे चालकाच्या बाजूला सिटवर बसले होते व गाडीचा चालक राहुल सुधाकर आमले गाडी चालवत वरखेडी येथून कुऱ्हाड गावी जात असतांना वरखेडी पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सार्वे गावाजवळ आर्टिका गाडीचे अचानकपणे पुढील चाकाचे टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली होती.
हा अपघात घडल्यानंतर संबंधित गाडी मालक व चालकाने लगेचच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर होऊन अपघात झाल्याची नोंद करुन घेत रितसर पंचनामा करुन घेत गाडीचा विमा काढलेला असल्याने ठराविक वेळेच्संया आत संबंधित विमा प्रतिनिधी व विमा कंपनीला कळवले व विमा मंजूर करण्यासाठी कंपनीच्या नियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर कली आहेत.
परंतु नामांकित विमा कंपनीकडून संबंधित आर्टिका गाडीच्या मालकाला उडवाउडवीची उत्तरे देऊन विमा संरक्षण रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने संबंधित वाहन मालक विमा कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असून संबंधित नामांकित विमा कंपनीकडून ग्राहकांना कसे फसवले जाते याची माहिती प्रसारमाध्यमांनसमोर मांडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.