डॉक्टर संतोष पाटील यांच्याकडून साड्या व फराळाचे वाटप

दिलीप जैन.(पाचोरा)
१३/११/२०२०
सुप्रसिध्द व्याख्याते लेखक व समाजसेवक डॉक्टर संतोष पाटील गोराडखेडेकर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले . पाचोरा येथील विभिन्न ठिकाणी राहणाऱया निराधार महिला व पुरुषांना त्यांनी दिवाळीनिमित्त मदतीचा हात दिला . यावेळेस त्यांनी महिला वर्गासाठी साडी, ब्लाऊज पीस, चिवडा, मोहन थाल चे वाटप केले तर पुरुषांना दिवाळी फराळ व फळांचे वाटप करण्यात आले . सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डॉ पाटील हे दीपावलीनिमित्त आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला नवीन कपडे घेत नाही. हे त्याऐवजी ते आपली दिपावली विभिन्न ठिकाणी राहणार्या गरजू लोकांसोबत साजरी करतात . दिवाळीला आपल्यालासुद्धा नवीन साडी मिळाल्यामुळे निराधार महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला . या वेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या सौ. वंदना संतोष पाटील , अमर चव्हाण, राजेंद्र पाटील , प्रथमेश पाटील , तन्मय पाटील , सुनील पाटील हे उपस्थित होते .