जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना अशोक चौधरी यांची निवड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२१
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना चौधरी
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना अशोक चौधरी, तर महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची नियुक्ती झाली. हा नियुक्ती मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात झाली आहे.या नियुक्तीचे पत्र नूतन पदाधिकाऱ्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले.
वंदना चौधरी या महिला आघाडीच्या प्रदेश संघटक सचिव, बुलढाणा जिल्हा निरीक्षकपदी कार्यरत आहेत. तर कल्पना पाटील यांच्याकडे या अगोदर ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. महिला आघाडीची नूतन जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी दिली.