वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा, तिडका ग्रामपंचायत व मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे (पाटील) याच्या सयुंक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०८/२०२२
वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा, सोयगाव तालुक्यातील तिडका ग्रामपंचायत व मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे (पाटील) याच्या सयुंक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी तिडका येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत सकाळी साडे आठ वाजेपासून दुपारी अकरा वाजेपर्यंतच्या वेळात घेण्यात येणार असून या डॉ. निळकंठ पाटील हे या शिबिरात किडणीतील मुतखड्यावर बिना टाका, बिना ऑपरेशन दुर्बीण व्दारे शस्त्रक्रिया तसेच वृध्द व्यक्तींना प्रोस्टेट व लघवीची समस्या यावर निदान व उपचार तसेच सर्व आजारांचे रोगनिदान करुन वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून’ मोफत शस्त्रक्रिया व मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत रोगनिदान व मोफत उपचार शिबिरात जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा, तिडका ग्रामपंचायत व मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे (पाटील) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.