अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पाचोरा ग्रामीण अध्यक्षपदी काशिनाथ चव्हाण व उपाध्यक्षपदी संजय पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२१
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पाचोरा ग्रामीण अध्यक्षपदी जोगे वडगाव येथील मा.श्री. काशिनाथ माहारु चव्हाण व उपाध्यक्षपदी वरखेडीचे मा.श्री. संजय लक्ष्मण पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल तालुका भरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. प्रदिप पाटील बाबा खंडापुरकर- राष्ट्रीय समन्वयक मा.श्री. गिरिराज महिराश, राष्ट्रीय प्रवक्ता माननीय सुनिताताई कसबे, विधी अॅड. राणीताई स्वामी, जळगाव जिल्हा अध्यक्ष मा.श्री. महेशभाऊ पाटील, जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्ष,जळगाव जिल्हा महिलाध्यक्ष शोभा ताई पाटील यांच्या आदेशान्वये व प्रदेश सरचिटणीस मिडिया विभाग अरविंद जाधव, प्रदेश अध्यक्ष माजी सैनिक विभाग उल्हास पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष राजु पाटील, विधी विभाग प्रदेश उपाध्यक्षा अॅड. स्वाती ताई शिंदे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रविण बोरसे, धुळे जिल्हा अध्यक्ष अनिल देसले, पारोळा तालुका अध्यक्ष प्रविण पाटील, पाचोरा विभागीय अध्यक्ष गजानन तायडे, रावेर विभागीय अध्यक्ष सुनील पवार, जळगाव शहराध्यक्ष निलेश बाविस्कर यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पाचोरा ग्रामीण अध्यक्षपदी जोगे वडगाव येथील मा.श्री. काशिनाथ माहारु चव्हाण व उपाध्यक्षपदी वरखेडीचे मा.श्री. संजय लक्ष्मण पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू व आपल्या अधिपत्याखाली सर्व कामे पार पाडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू आश्वासन नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष आणि दिले.