पाचोरा शहरातील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त २८ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०५/२०२३
पाचोरा येथील कृष्णापुरी परिसत डॉ. राहुल झेरवाल हे सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून अहोरात्र अविरत सेवा देत असून हा वैद्यकीय व्यवसाय करत असतांनाच आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून रुग्णांवर कमी खर्चात जास्तीत, जास्त चांगले उपचार कसे करता येतील याकडे त्यांचा अधिक कल असतो तसेच अधुनमधून ते वेगवेगळ्या आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन गोरगरिबांची सेवा करत असतात. अशा डॉ. राहुल झेरवाल यांच्या पाचोरा येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीला येत्या २८ मे २०२३ रविवार रोजी सहा वर्षे पुर्ण होत असून सातव्या वर्षात पदार्पण करत आहे. म्हणून या सातव्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी दहा वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सिध्दीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल झेरवाल यांनी केले आहे.
या मोफत आरोग्य शिबिरात मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. महेंद्र चौधरी, प्राईम हॉस्पिटलमधे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. अंकुर दादा झंवर, डॉ. संदिप मोरे. (डायोसीस निदान) हे रुग्ण तपासणी करणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेऊन आम्हाला रुग्णसेवेची संधी द्यावी असे आवाहन सिध्दीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल झेरवाल यांनी केले आहे.
“सिध्दीविनायक हॉस्पिटलची यशस्वी वाटचाल”
पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ. प्रभाकर झेरवाल यांचे सुपुत्र डॉ. राहुल झेरवाल यांनी सहा वर्षांपूर्वी पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला असुन या हॉस्पिटलमध्ये डे. केअर, बालकांसाठी (आय. पुल डी.) बालरोग विभाग, इ. सी. जी, एक्सरे, अल्ट्रासोनिक निमोलायझर, प्यारा कॉर्डीक मॉनिटर, इत्यादी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देत अत्यल्प मोबदला घेऊन चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा पुरवत आहेत.
विशेष म्हणजे डॉ. राहुल झेरवाल यांनी ऐन कोरोना सारख्या काळात पाचोरा शहरातील जवळपास सर्वच दवाखाने कोरोना बाधीत रुग्णांसाठी राखीव झाले असतांना मनात कोणतीही भिती न बाळगता नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली ही सेवा पुरवत असतांना मी सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध करुन दिले हे करत असतांना कोरोनाच्या भितीने भयभीत झालेल्या रुग्णांना उपचार करुन ते जेव्हा बरे होऊन जायचे तेव्हा त्या रुग्णाच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून मला जे मानसिक समाधान व त्यांच्याकडून जे आशिर्वाद मिळायचे ते माझ्यासाठी लाखमोलाचे होते व यातुनच मला यातुनच मला चालना मिळाली व मी आज सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेच्या सातव्या वर्षात पदार्पण करत आहे. यापुढेही अशीच रुग्णसेवा करण्याचा माझा प्रयत्न असेल असे सांगून जनतेने आम्हाला पुढील वाटचालीसाठी असेच सहकार्य आर्शिवाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.