शालिग्राम मालकर यांचा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांचे खंदे समर्थक मा. श्री. शालिग्राम ओंकार मालकर यांनी आज रोजी पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मा. श्री. शालिग्राम मालकर यांनी माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी जाऊन असंख्य कार्यकर्त्यांसह भेट घेतली तसेच सविस्तर चर्चा करुन आपला उमेदवार अर्ज दाखल केला.
यावेळी दीपक बोरसे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, पाचोरा माळी समाज माजी अध्यक्ष संतोष महाजन, गुरुगोविंद सोसायटी चे सुनील क्षीरसागर, दिनेश बडगुजर, ग्राम विकास मंडळ माजी अध्यक्ष अर्जुन जाधव सर, संचालक जयप्रकाश जैन, बालू दादा बडगुजर, तोताराम मेटे, भडगावचे दिनेश पाटील, कोळगावचे उपसरपंच शामराव पाटील सर, शशिकांत मालकर, राजेंद्र गिते, कृऊबाचे उमेदवार शालिग्राम मालकर, राष्ट्रवादीचे रणजित पाटील सर, हर्षल पाटील, राष्ट्रवादी भडगाव शहराध्यक्ष रवींद्र महाजन, विजय काळे, धनराज पाटील, राजेंद्र हिवाळे, दगडू माळी, वसंत गिते, राजधर मालकर, विठ्ठल नारायण गिते, सुरेश भडांगे, प्रशांत माळी, विठ्ठल रामदास गिते, स्वप्नील गिते, बापू महाजन आर्वे, पी डी भोसले, विजय सावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.