गुरुगोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत नम्रता पॅनल विजयी.
दिपक मुलमुले.(पिंपळगाव हरेश्र्वर)
दिनांक~१६/०५/२०२२
पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद विकास सोसायटीची २०२२ ते २०२७ साठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच घेण्यात आली असून या निवडणुकीत शेतकरी पॅनल हे पतंग आणि नम्रता पॅनल हे कपबशी चे चिन्ह घेऊन निवडणुकीत समोरासमोर एकमेकांच्या विरोधात उतरल्याने या दोन पॅनलमध्ये सरळ, सरळ लढत होती. ही पंचवार्षिक निवडणूक कधी नव्हे इतक्या चुरशीची होती म्हणून निवडणूक निकाल लागेपर्यंत कोण निवडून येईल हे सांगणे अवघड होते मात्र तरीही या निवडणुकीत नम्रता पॅनलच्या उमेदवारांनी अथक परिश्रम घेऊन ९ जागेवर विजय मिळवून सोसायटी आपल्या ताब्यात घेतली.
यात अनुसूचित जाती जमातीचे विजय शांताराम सावळे हे नम्रता पॅनलचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. तसेच
सर्वसाधारण कर्जदार सभासदांमधून नम्रता पॅनल चे सर्व ८ उमेदवार निवडून आले त्यात राजधर माधव मालकर (६५०), राजेंद्र शंकर गीते (६४७), जयप्रकाश रतीलाल जैन (६३१), शालिग्राम ओंकार मालकर (६२७), खाटीक अनिस हाजी भैय्या (६०७), नाईक विजयसिंह धर्मा (५८७), चव्हाण ज्योतीलाल मोहनदास(५९०), बडगुजर बालू तुळशीराम (५७२) तर शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार बडगुजर गंगाधर श्रावण (२०४), मुसलमान शेख रफिक शेख उस्मान (१८३), कुटे संतोष सीताराम (१८२), परमाणे विठ्ठल रामा (१७९), बडगुजर रवींद्र माधव (१६१), इतरमागास वर्गात नम्रता पॅनल चे सुनील संपत क्षीरसागर (६२१) विजयी तर शेतकरी पॅनल चे किशोर भिकणराव गरुड (१७५), महिला राखीव मधून नम्रता पॅनल च्या श्रीमती जयश्री सुनील बडगुजर (६४५), सौ भीमाबाई तोताराम पाटील (६२८) भरघोस मते मिळवून विजयी झाले आहेत.
(शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना मात्र अपयशाला सामोरे जावे लागले आहे.)
याप्रसंगी नम्रता पॅनलचे पॅनल प्रमुख सुखदेव गीते सर, शालिग्राम मालकर, राजुदादा क्षीरसागर, विठ्ठल नारायण गीते, वसंत गीते, विठ्ठल रामदास गीते, रवी जाधव, रवी गीते, राजू माळी, प्रशांत माळी, मौजूलाल जैन, दिलीप जैन, मिलिंद देव, देवेंद्र देव, सुरेश बडगुजर, किरण बडगुजर, राजधर मेटे, बी डी पाटील सर, गोरख पाटील, शिवदास भुरा राठोड, शिवदास ताराचंद राठोड, डॉ नितीन चव्हाण, योगेश हटकर, धनराज मदने, गुलाम बागवान (गुल्लू शेठ), खुर्शीद मिस्तरी, सुभाष सावळे यांचेसह अनेक मान्यवर होते.
विजयी सर्व उमेदवारांचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे.