अजिंठा घाटात खासगी बसला अपघात बस थोडक्यात बचावली.
कदीर पटेल (सिल्लोड तालुका प्रतीनिधी)
दिनांक~३१-१२/२०२०
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेल्यामूळे येथे नियमितपणे अपघात होत आहेत. मंगळवारी सकाळी सुध्दा एक खासगी बस भीषण अपघातातून वाचली आहे. ब्रेक निकामी झाल्याने सदर बस डोंगराच्या भितीवर जोराने धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी ६ वाजता पूणे येथून जळगाव जाणार्या खासगी बसचे अचानक ब्रेक निकामी झाले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत ही बस घाटाच्या डोंगराकडील भागाला धडकवली या बसमध्ये पंचवीस प्रवासी प्रवास करीत होते. हे सर्व प्रवासी सूखरूप आहेत. चालकाने जर प्रसंगावधान दाखविले नसते तर याठिकाणी भीषण अपघात घडला असता. ही बाब माहिती पडल्यानंतर सर्व प्रवाशांनी चालकांचे आभार मानले औरंगाबाद ते जळगाव महामार्गावर जड वाहतकीचे प्रमाण मोठे आहे. या मार्गावरील अजिंठा घाटात डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे येथून दररोज प्रवास करणार्रा प्रवाशांना मणक्यासह धूळीमूळे श्रसनाचे आजार जडत आहेत. तसेच वाहनांचे अपघात होत आहेत. घाट रस्त्याचा एवढी दूरवस्था होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग कूंभकरणाची झोप घेत आहेत.