पत्रकार अशोकबापु परदेशी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२१
कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या आपत्तीमध्ये सामाजिक बांधीलकी जपत निर्भीडपणे आपले कर्तव्य बजाविले. स्वताची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कोरोना महामारीचे हे युद्ध जिंकण्यासाठी तन, मन, धनाने आपण आपले कार्य प्रामाणिकपणे निभावत आले आहात. स्वतः कोरणाच्या संकटात असताना देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेचे व्रत जोपासत आपले कार्य सूरु ठेवले. हे त्यांच्या मानवतेची व संवेदनशिलतेची प्रचिती निर्माण करून देते. आपण बजावलेल्या या निस्वार्थ सेवेबद्धल, कार्याची दखल घेत. आज सन्मानपञ देउन अशोकबापुंना भडगाव तहसिलदार मा. श्री. सागर ढवळे साहेबांच्या हस्ते गौरविण्यात आले . कोरोना योद्धयांचा सन्मान सोहळयाचे आयोजन भडगाव येथे महाराष्टृ नवनिर्माण पञकार संघामार्फत करण्यात आले होते .हा कार्यक्रम भडगाव ग्रामीण रुग्णालयाजवळ आयोजीत करण्यात आला होता*.——————————————
*अशोक बापुंना भडगाव येथे तहसिलदार मा. श्री. सागर ढवळे साहेबांच्या हस्ते सन्मानपञ , पुष्पगुच्छ, शाल देउन कोरोना योद्धा म्हणुन सन्मानीत करण्यात आले. यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक उतेकर साहेब, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विजयकुमार भोसले, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिल वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. अमोलभाऊ पाटील, महीला दक्षता समितीच्या अध्यक्षा , माजी नगर सेविका योजनाताई पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डाॅ. पंकज जाधव, माजी नगरसेवक श्री. मनोहरभाऊ चौधरी, आर पी आयचे तालुकाध्यक्ष श्री. आण्णासो, सुपडु खेडकर , माऊली फौंडेशनचे श्री. युवराज आबा सुर्यवंशी, श्री.जाकीर कुरेशी, समर्पण हाॅस्पीटलचे डाॅ. निलेश पाटील, डाॅ. पल्लवी पाटील, संतोष महाजन, भांङारकर आदि व्यासपिठावरील मान्यवरांच्या उपस्थित, आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, नागरीकांच्या उपस्थितीत कोरोना योद्धयांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. महाराष्टृ नवनिर्माण पञकार संघाच्या अनिल वाघ यांचेसह सर्व टिमने चांगले नियोजन केले होते. कार्याची दखल घेतल्याने पुरस्कारर्थीनी त्यांचे आभार मानले. अशोकबापुंच्या अनमोल सेवा, कार्याबद्धल व कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत झाल्याबद्धल मनापासुन अभिनंदन.