कुर्हाड खुर्द येथे विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू, ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरातील जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पाठीमागील परिसरा विजेच्या धक्क्याने एका वानराचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसापासून वानर सैन्य घराघरावर उड्या मारत होते .रविवारी दिनांक ०८ आँगस्ट रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उडी मारतांना डि.पी. स्टेक्चर वर धडकल्यामुळे अचानक विजेचा धक्का लागून हे वानर रस्त्यावर कोसळले.
याबाबतची माहिती विद्युत सहाय्यक बंटी यांना कळताच त्यांनी विद्युत पुरवठा त्वरित बंद केला. परिसरातील नागरिकांनी लगेचच त्या माकडाकडे धाव घेऊन त्याल्या पाणी पाजून वाचविण्याचा प्रयत्न केला.त्या अगोदरच मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी जगदीश तेली, सतिष देशमुख,मुरली तिरमल, महेंद बोरसे सागर निकम, सुभाष चव्हाण, गणेश पाटील, दिपक बोरसे, राहुल बोरसे, यांनी हिंदु प्रथे प्रमाणे अंतिम यात्रा काढुन जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून परिसरात वानराचे दफन करण्यात आले.
वानराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.