पाचोर्यात नपा गाळेंचा लिलाव होणार लहान व्यापारींनी भाग घ्यावा :कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन
पाचोर्यात नपा गाळेंचा लिलाव होणार लहान व्यापारींनी भाग घ्यावा :कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा शहरातील नगर परिषद च्या मालकीचे शॉपींग गाळेंचा लिलाव सकाळी १० वाजता होणार असून लहान व्यापारींनी भाग घ्यावा असे आवाहन कॉग्रेस सचिन सोमवंशी यांनी केली आहे
गाळेंची ज्यांना गरज आहे! मात्र ऐपत असुन कोरोना च्या काळातील लॉकडाउन मुळे व्यापारी पेठ ठप्प झाली त्यामुळे लहान गरजु व्यापारी अनामत रक्कम आज भरु शकत नव्हते म्हणून कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी करुन वस्तूस्थिती मांडली एका ३०८ याचिकेच्या लिकाल देतांना श्री सोमवंशी यांनी दिलेले निवेदन ची देखील दखल घेऊन नगर परिषद ला काही आदेश दिले त्यात महत्त्वाचा आदेश आहे की जो पर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत नपा ने कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये त्यामुळे आता धनदांडगे भाग नघेता गरजु लहान व्यापारीच भाग घेतील त्यांनी तातडीने लिलावात भाग घ्यायचा आहे. लिलावाची बोली बोलायची असल्याने जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार आणि लहान व्यापारी यांनी बोलीत भाग घ्यावा. आ. किशोरअप्पा पाटील यांनी लहान व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांच्या साठी प्रयत्न करावे अशी विनंती श्री सोमवंशी यांनी केली असून मा. जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांचे आभार मानले आहेत.