पिंपळगाव हरेश्वर पो. स्टेशनची मोठी कारवाई हात भट्टया नेस्तनाबूत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२१
(पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील व लोहारा दुरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गावातील गावठी व देशी दारु विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे.)
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्यानेच बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये यांनी पोलीस स्टेशनला हजेरी लावताच लगेच अवैधधंद्याचे विरोधात मोहीम उघडली आहे. यात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाव, शिवारातील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
यात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील व शिंदाड येथून जवळच असलेले सातगाव शिवारातील धरणाकाठी असलेल्या दारूच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईचे परिसरातील जनतेने जोरदार स्वागत केले असून महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून पोलिसांबद्दल असलेला गैरसमज दूर होऊन आदरयुक्त वातावरण तयार झाले असल्याने गावागावातील सुज्ञ नागरिक मा.श्री. कृष्णा भोये यांना अवैधधंद्याची गुप्त माहिती देऊन कारवाईची मागणी करत आहेत.
अशीच गुप्त माहिती मिळाल्याच्या खबरीवरून मा.श्री. कृष्णा भोये यांच्यासोबत पोलिस रणजीत पाटील, अरुण राजपूत, ज्ञानेश्वर बोडके, , रविद्रसिग पाटील सदीप राजपूत आदींच्या पथकाने गोपनीयता पाळून सातगाव डोगरी रस्त्यालगत असलेल्या धरणाजवळ गावठी हातभट्टी चालवत असतांना धाड टाकली. त्याची हातभट्टी नेस्तनाबूत करण्यात आली. या धाडीत भट्टीवरील कच्चे रसायन १४००/ तर /किमतीचे असे नष्ट करण्यात आले असून, कलम ६५ अन्वये एकाआरोपीवर गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आमच्या हद्दीतील एकही अवैध धंदा सुरू राहणार नाही. अशी ग्वाही मा.श्री. कृष्णा भोये व त्यांच्या पथकाने दिली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.