दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२३

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव हरेश्वर येथील प्रिश युवा फॉउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. प्रितेश भाऊ जैन यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत माध्यमिक विद्यालयातील व मूकबधिर विद्यालयातील एकूण ५०० मुलांनी भाग घेऊन चांगल्याप्रकारे उत्कृष्ट चित्र रेखाटले होते. पैकी उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या विजयी स्पर्धकांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्र जी बाफना, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ पाटील, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संदीप जैन, जेष्ठ शिवसैनिक मा. श्री. देविदास पाटील, मा. श्री. राजाबाबू तेली, मा. श्री. भगवान पाटील, मा. श्री. कोमल देशमुख, पिंपळगाव हरेश्वरचे शहराध्यक्ष मा. श्री. भागवत पाटील, मा. श्री. अजय तेली, मा. श्री. अतुल सुर्यवंशी, मा. श्री. राहुल बडगुजर, मा. श्री. समाधान हाटकर हे मान्यवर उपस्थित होते. या चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास विद्यालयाचे संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रितेश भाऊ जैन यांनी कथक परिश्रम घेतले.