जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०३/२०२३
प्रत्येकाला आपल्या जीवनात डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. परंतु हे डोळेच जर सुरक्षित नसतील तर मात्र या पृथ्वीतलावर असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक रंग, माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव, रंग हे पाहायला मिळणार नाहीत व माणसांचे जीवन असून नसल्यासारखे होईल.
आपण जन्मताच आपले डोळे सुंदर व सुरक्षित असतात परंतु वयानुसार डोळ्यात वेगवेगळ्या व्याधी येतात यापैकी एक म्हणजे मोतीबिंदू, मोतीबिंदू हा कोणाच्याही डोळ्यात होऊ शकतो परंतु मोतीबिंदू झाल्यानंतर प्रत्येकाला ऑपरेशन करणे शक्य नसते. कारण सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती सारखी नसल्याने बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यात मोतीबिंदू असल्यावरही ते शस्त्रक्रिया करु शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पाचोरा तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी “रुग्णसेवेचे एकच केंद्रबिंदू, पाचोरा तालुक्यात नसावे एकही मोतीबिंदू” ही संकल्पना घेऊन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ०८ मार्च २०२३ बुधवार रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात दिनांक ०८ मार्च बुधवार रोजी पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या शिवतीर्थ कार्यालय येथे सकाळी आठ वाजल्यापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत मोतीबिंदू तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांचे ऑपरेशन संपूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असून सोबतच ऑपरेशन नंतरची १ आठवडयाची औषधी विनामूल्य, कॅम्पच्या ठिकाणाहून हॉस्पिटल पर्यंतची जाण्या-येण्याची सुविधा विनामूल्य, हॉस्पिटल मधील वास्तव्या दरम्यान चहा, नाश्ता दोन्ही वेळेचे जेवण सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या तर्फे दिले जाईल, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना काळा चष्मा विनामूल्य दिला जाणार आहे.
“सौ. वैशालीताई सुर्यवंशी”~
पाचोरा तालुक्यातील जनता जनार्दनास कळविण्यात अत्यानंद होतो की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजाच्या सर्व घटकातील मायबाप जनतेस दूरदृष्टी देण्याची संकल्पना असून पाचोरा तालुका मोतीबिंदू मुक्त व्हावा या उद्देशाने शहरी व ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला मोतीबिंदू झाल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची देखील त्यांची आर्थिक क्षमता नसते. जमेल त्या प्रमाणे तो आपले जीवन जगत असतो हि समस्या घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून “पाचोरा तालुका मोतीबिंदू मुक्त तालुका” हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून त्या माध्यमातून तळागाळातील जनतेला दृष्टी देण्याच महत्वपूर्ण काम सुरु केले आहे. मोतीबिंदू विरुद्ध सुरु केलेला हा सामना आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. तरी पाचोरा तालुक्यातील सर्व मोतीबिंदू पिडीतांनी माय-बाप जनतेने लाभ घ्यावा ही नम्र विनंती.