कार्यकर्ते व पदाधिकारी बनले ठेकेदार विकास कामात भ्रष्टाचार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२०
पाचोरा तालुक्यासह सगळीकडे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, पंचायतसमीती मार्फत रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, शौचालय, विविध कार्यालये, व्यायामशाळा अशी ऐक ना अनेक विकास कामे झाली आहेत. काही सुरु आहेत तर काही नव्याने सुरु होणार आहेत.
परंतु ही कामे करून घेतांना संबंधित जबाबदार लोकप्रतिनिधी, ही कामे ज्यांच्या अखत्यारीत येतात ते अधिकारी, इंजिनिअर व इतर जबाबदार घटक ही कामे नियमानुसार कुणी करायला पाहिजे तसेच ही कामे करुन घेतांना शासनाने ठरवून दिलेल्या पध्दतीने काळजीपूर्वक कामे करुन घेत नसल्याचे दिसून येते.
तसेच वरिल विकासकामे करतांना ज्या, त्या कामाचे तज्ञ इंजिनिअर व मान्यताप्राप्त ठेकेदार यांच्याकडून करुन घेणे क्रमप्राप्त असल्यावरही तसे न करता सत्ताधारी लोकांच्या मर्जीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कामे दिली जात आहेत.कींवा एखाद्या इंजिनिअरला हाताशी धरुन फक्त नामधारी ठेकेदार बनवून दुसरेच मलिदा खात आहेत. तरी फक्त कमिशनचा धंदा करणारे इंजिनिअर शोधून त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे.
ही कामे करत असतांना या कामाचे देखरेखीसाठी नियुक्त अधिकारी व इंजिनिअर हे जातीने लक्ष देत नसून होणारी विकास कामे हीन दर्जाची होतात. या प्रकारामुळे झालेली विकास कामे थोड्याच दिवसात दिसेनाशी होतात. व गावाचा विकास फक्त कागदोपत्री होतो नंतर गाव भकास झालेले दिसून येते.
तरी वरिष्ठ पातळीवरुन हा गैरप्रकार थांबण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.