सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१९/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने काल शनिवारी रोजी रात्री ठिक १२ वाजता भारतीय जनता पार्टी शाखेतर्फे कुऱ्हाड येथील बसस्थानक परिसरात मान्यवरांच्या हस्ते महाआरती करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

तसेच आज सकाळी आठ वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेत शाळकरी मुलांना
घोड्यावर बसवून ढोल, ताशांच्या तालावर शाळेतील विद्यार्थिनींनी लेझीम खेळत देखाव्यासह माळी मंगल कार्यालया पासून मिरवणूकीला सुरवात करण्यात आली. मिरवणूक श्री. खंडेराव चौकात आल्यानंतर मानवंदना देत मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून श्री. छत्रपती शिवाजीराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्री. हर हर महादेव, श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी श्री. खंडेराव चौक व कुऱ्हाड गाव परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब, कुऱ्हाड नगरीच्या सरपंच सौ. कविता महाजन, माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. संतोष चौधरी, उद्योजक मा. श्री. संजय शांताराम पाटील, युवानेते मा. श्री. जगदीश तेली, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन, अरुण बोरसे व इतर मान्यवरांचा शिवजयंती उत्सव समिती तर्फे शिवचरित्र, गुलाब पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

खरी युवापिढी घडवण्यासाठी शिवरायांच्या विचारांची गरज. (सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे.)
—————————————

आजच्या बदलत्या युगात झपाट्याने बदल होत असतांना आपली संस्कृती व परंपरा टिकवून ठेवण्यासाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असून याकरिता श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संस्कार, शिस्त व राष्ट्रप्रेम हे आचरणात आणले पाहिजे. तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना नक्कीच मिरवणूक काढली पाहिजे यामुळे इतिहासाला चालना मिळते व नवचैतन्य निर्माण होते परंतु यासोबतच आपण जशी नाचून जयंती साजरी करतो तसेच शिवचरित्र वाचून ते आचरणात आणले पाहिजे तरुणांनी व्यसनापासून लांब राहून समाजहितासाठी व देशहितासाठी झटले पाहिजे असे मत मांडले.

तसेच कुऱ्हाड खुर्द येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज व मॉंसाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही दृश्य साकारले तसेच काही विद्यार्थ्यांनी पोवाडे व सांस्कृतिक व देश भक्तीपर गिते म्हटली. यावेळी शाळेच मुख्याध्यापक मा. श्री. जितसिंग परदेशी, शेतकरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. प्रदीप महाजन, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, रमेश मुके, मनोज शिंपी, कैलास बापू भगत, उपसरपंच अशोक देशमुख, विलासराव पाटील, गणेश पाटील, प्रदीप जाधव, संजय काळे, वेले मॅडम, बडगुजर मॅडम, पालकवर्ग, ग्रामस्थ, महिलावर्वग विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळी आठ वाजल्यापासून मिरवणूकीला सुरवात होऊन तब्बल तीन तास ही मिरवणूक घोषणाबाजी करत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. या मिरवणुकीत कुऱ्हाड गावातील शिवप्रेमी, ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिवजयंती समितीचे अध्यक्ष पप्पू गायकवाड, उपाध्यक्ष विलास चव्हाण, सदस्य संदीप शिंदे, दिगंबर चौधरी, राजू चौधरी, सुनील लोहार, सुजित शिंदे व आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
कुऱ्हाड येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी.