ऐकावे ते नवलच सावद्यात (स्टिक फास्ट) सोल्युशन ट्यूबचा नशा करणारी मंडळी सक्रिय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२१
(कमी पैशात बेधुंद राहण्यासाठी शहरातील तरुण वर्ग करू शकते यांचे अनुकरण.)
जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बाहेर गावाहून आमोदा भिकनगाव या महामार्गच्या कडेला सावदा फैजपूर रस्त्यावर झोपडया टाकून तात्पुरता स्वरूपात राहत असलेले लोक शहरातील केरकचरा वगैरे वेचून तसेच स्वतःची गरिबीचा देखावा करून लोकांकडून पैसेदेखील मागून उदार निर्वाह करून ते थेट नशेच्या आहारी गेलेली दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा ते फैजपूर रस्त्यावरील झोपडया टाकून तात्पुरता स्वरूपात राहत असलेली महिला पुरुष व तरुण मुले शहर व परिसरात केर कचरा जमा करून तसेच स्वतःची गरिबीचा देखावा करून भिक देखील मांगतात व या पैशातून नशेचे पदार्थ सोल्युशन ट्यूब (स्टिक फास्ट) हे विकत घेऊन प्लास्टिकच्या पिशवी टाकून त्याला खाली,वर करतात यामुळे प्लास्टिक पिशवीत धूरा सारखी तयार होणारी वाफ सदरील तरुण महिला आपल्या नाकात व तोंडा द्वारे शोषून घेतात.
त्यामुळे त्यांना भयंकर अशी नशा होत असते. नशा करून शहरात कोणत्याही ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी ही मंडळी निद्रावस्थेत आढळतात सदरील नशा करणारे हे अशिक्षित असून याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर काय होईल याची कल्पना सुद्धा त्यांना नसावी फक्त नशा आणि नशा साठी १०ते१५ रुपयात भेटत असलेली सोल्युशन ट्यूब म्हणजे कमी पैशात नशेचा भरपूर आनंद घेऊन आपले आयुष्य संपवीत आहेत.
अशा व्यसनाधीन लोकांना बघून थेट शहरातील बाला अवस्थेतील व तरुण वर्गाकडून त्यांचे अनुकरण करण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून अशा या अशिक्षित व नशेच्या आहारी गेलेल्या लोकांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून तात्काळ योग्य ती दखल घेतली जावी. तसेच हे सोल्युशन ट्यूब कुठून उपलब्ध करतात याचीदेखील सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा सुजाण नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.